चिखली न्यायालयात शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी आमने-सामने, दिवसभर कोर्टात पण एकमेकांकडे न पाहताच कोर्टातून बाहेर..

चिखली न्यायालयात शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी आमने-सामने, दिवसभर कोर्टात पण एकमेकांकडे न पाहताच कोर्टातून बाहेर..

ऍड शर्वरी सावजी -तुपकरांनी घेतली उलटतपासणी..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आज चिखली न्यायालयात अनपेक्षित चित्र पहायला मिळाले. एकेकाळी एकत्र लढा देणारे दोन शेतकरी नेते – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राहिलेले राजू शेट्टी आणि सध्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर  हे दोघे एकाच कोर्टात दिवसभर हजर होते.न्यायधिशांसमोर पुरावा सुरु असताना बेंच वर बसून होते, मात्र आश्चर्य म्हणजे, कोर्टाच्या आवारात दोघांनी एकमेकांचे तोंडसुद्धा पाहिले नाही.

महिलांना घरबसल्या उद्योगासाठी 35% अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या

२०१७ मधील खामगावातील आंदोलन पार्श्वभूमि…

खामगाव ते नागपूर महामार्गावर २०१७ साली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते.रास्ता रोको करून 5 तास वाहूतुक थांबवली होती.यात शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला भाव आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या वेळी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे दोघेही खांद्याला खांदा लावून उभे होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तेव्हाच्या सरकारला चांगलाच दम भरला होता.

मात्र, त्या आंदोलनादरम्यान रास्ता रोको केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्ह्याच्याच सुनावणीसाठी आज दुपारी तीन वाजता चिखली न्यायालयात तारीख होती. यानिमित्ताने दोन्ही नेत्यांची आपापल्या कार्यकर्त्यांसहित उपस्थिती कोर्टात झाली.तुपकर समर्थक आणि शेट्टी समर्थक वेगवेगळ्या कोपऱ्यात उभे पाहायला मिळाले.

नवीन उद्योगांसाठी 30 लाखाचे कर्ज आणि 10 लाखाची सबसिडी; फक्त या उद्योगांसाठीच मिळणार हे लोन- इथून करा अर्ज!

आजची कोर्टातील स्थिती..

न्यायालयात हजर असताना दोन्ही नेते एकमेकांपासून लांबच राहिले. कुठलाही संवाद नाही, एकमेकांकडे नजरही नाही. कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून दोघेही शांतपणे बाहेर पडले. उपस्थितांना हा प्रकार विशेष लक्षवेधी ठरला.दोघे बोलतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.

एकेकाळी सहकारी, आज वेगळ्या वाटा…

एकेकाळी शेतकरी चळवळीत खांद्याला खांदा लावून काम करणारे शेट्टी व तुपकर हे आज दोन वेगळ्या संघटनांचे नेतृत्व करीत आहेत. राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व करत आहेत, शेट्टीनी तुपकरांना बाजूला केल्यानंतर तर रविकांत तुपकर यांनी स्वतंत्र क्रांतिकारी शेतकरी संघटना उभी केली आहे. त्यामुळे विचारधारा आणि नेतृत्वाच्या वाटा बदलल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघेही सातत्याने सक्रिय आहेत.

आज मात्र चिखली न्यायालयात दोघेही आमनेसामने आले, पण तरीसुद्धा माजी सहकारी आता एकमेकांशी संवाद टाळत आहेत, असे दृश्य पाहायला मिळाले.

शेत मोजणीसाठी भरती! भूमिअभिलेख विभागात मोठी भरती; 700 पदांच्या भरतीसाठी शासनाची मान्यता

ऍड शर्वरी सावजी- तुपकरांनी घेतली साक्षीदाराची उलट तपासणी..

रविकांत तुपकर व इतर कार्यकर्त्यांसाठी ऍड शर्वरी सावजी तुपकरांनी कोर्टात किल्ला लढवला. ऍड शर्वरी सावजी यांनी महाजन नावाच्या पोलीस अधिकऱ्याची जबरदस्त क्रॉस घेतली. प्रश्नांचा भडीमार केला.राजू शेट्टीनी स्वतः साठी दुसरा वकील लावला.शेट्टीच्या च्या वतीने ऍड जपे यांनी ऍड शर्वरी सावजी यांनी घेतलेली क्रॉसच आम्हाला मान्य असून तीच क्रॉस आम्ही स्विकारात आहोत, असे म्हणत त्यांनी हर्ड म्हटले,त्यामुळे शेट्टीच्या वकीलांना काहीच बोलावे लागले नाही.. हे विशेष..!

Join WhatsApp

Join Now

1 thought on “चिखली न्यायालयात शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी आमने-सामने, दिवसभर कोर्टात पण एकमेकांकडे न पाहताच कोर्टातून बाहेर..”

Leave a Comment

WhatsApp Join Group!