बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील सैलानी मध्ये एका कुख्यात गुंडाचा धारदार चाकूने खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सैलानी दर्ग्याजवळील यात्रेदरम्यान घडली, जिथे गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी हल्ला केला.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव शेख नफिज शेख हाफिज (वय ३८, रा. इंदिरानगर- बुलढाणा) असे आहे. नफिज हा त्याच्या मित्रांसोबत सैलानी दर्ग्यातील यात्रेसाठी गेला होता. तिथे जुन्या वैराच्या रागातून तीन आरोपींनी त्याच्यावर धारदार चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. आरोपींची नावे अशी आहेत – अलेक्स इनॉक जोसेफ ऊर्फ रोनी, शेख सलमान शेख अश्फाक आणि सय्यद वाजीत राजू ऊर्फ वाजीत टोपी. हे तिन्ही आरोपी सैलानी गावातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख नफिज हा जेबकतरा म्हणून ओळखला जात असे. त्याच्या नावावर मारहाणीच्या काही गुन्ह्यांची नोंद आहे. इतकेच नव्हे, तर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी त्याला तडीपारही केले होते. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असून, जुन्या वादाचा सूड उगवण्यासाठी हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
Punjab And Sind Bank Bharti 2025: 750 LBO जागांसाठी अर्ज सुरू, 85,920 पगार, लगेच अर्ज करा!
या प्रकरणाचा तपास रायपूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश सोळंकी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल जाधव आणि अत्तर शेख हे करत आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून, यात्रेदरम्यान अशा हिंसक घटना रोखण्यासाठी पोलिसांची सतर्कता वाढवण्याची मागणी होत आहे.














