बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षा पासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी पालकांनी वारंवार शिक्षण विभागाकडे निवेदने दिले. मात्र, निवेदनाची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या पालकांनी २५ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शाळा भरवली. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत सीईओंच्या दालनासमोरच शाळा भरवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच भौतिक सुविधाही नसल्याने पटसंख्या घटत आहे. चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी पालकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिले. मात्र, शिक्षण विभागाने या निवेदनांची दखलच घेतली नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या अमोना येथील पालकांनी विद्यार्थ्यांसह शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवली. पालकांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची तारांबळ उडाली. जो पर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
1 thought on “अमोनाच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या पालकांनी सीओच्या दालनात भरवली शाळा… जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही”