बुलढाणा (अल्ताफ खान – बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम २४ जुलै २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडला. शिवसेना आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्लेसवेल इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित संस्थेच्या माध्यमातून बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे २५० ते ३०० युवक-युवतींना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. या नियुक्त उमेदवारांना लवकरच त्यांच्या कार्यक्षेत्रात रुजू होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
BREAKING: चिखली तालुक्यात दुर्दैवी घटना: नवरा-बायकोची गळफास घेऊन आत्महत्या…
या कार्यक्रमाला युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्री. सरपाते, डॉ. अमित भामरटकर (मोताळा तालुका), डॉ. निखिल जवरे (यूपीएससी MO, बुलढाणा), दीपक महाले (IFM), NHM चे श्री. सोनुने, निषाद येरमुले, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, संतोष शिंगणे, जीवन उबरहंडे, ज्ञानेश्वर खांडवे, रोहित गवळी यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेरोजगारीमुळे हताश झालेल्या तरुणांमध्ये या उपक्रमामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. “आमदार धर्मवीर संजय गायकवाड हे केवळ आश्वासने देत नाहीत, तर प्रत्यक्षात संधी उपलब्ध करून देतात,” अशी भावना या उपक्रमानंतर तरुणांमध्ये व्यक्त होत आहे. रोजगार ही केवळ आर्थिक गरज नसून, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा मुद्दा आहे. या दृष्टीने आमदार गायकवाड यांचे योगदान तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हा उपक्रम केवळ सुरुवात असून, येत्या काळात बुलढाणा जिल्ह्यातील हजारो तरुणांसाठी स्थानिक पातळीवर आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याचे नियोजन सुरू असल्याचे आमदार गायकवाड यांनी यावेळी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांसाठी ही नवी दिशा निश्चितच भविष्यातील प्रगतीचा पाया रचणारी ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.