शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासणार नाही – आमदार सौ. श्वेता महाले पाटील

शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासणार नाही – आमदार सौ. श्वेता महाले पाटील

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज):शेतकरी हा केवळ उपजीविकेचा आधार नाही, तर तो या राज्याचा आणि देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे खते, बियाणे आणि अन्य शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची कमतरता शेतकऱ्यांना भासू नये, याची काळजी घ्यावी, अशी स्पष्ट सूचना आमदार सौ. श्वेता महाले यांनी जिल्हा कृषी विभागाला दिली आहे.

ओ भाई क्या अब साईकिल के बजट में मिलेगी ये इलेक्ट्रिक स्कूटर?

बुलढाणा जिल्ह्यातील धाड आणि चिखली तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांनी युरिया खताच्या तुटवड्याबाबत आमदार सौ. श्वेता महाले यांच्याकडे तक्रार केली होती. ही बाब गंभीरपणे घेत त्यांनी तातडीने जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला. धाड आणि चिखली परिसरातील युरिया खताच्या उपलब्धतेची संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी बफर साठ्यातील युरिया त्वरित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

अनुकंपावरील दहा हजार पदे भरणार; उमेदवार नियुक्तीचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांचे

या निर्देशानुसार, जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली युरिया खताचे वितरण तातडीने करण्यात आले. धाड येथील ओवी एंटरप्राइजेस, ऋषिकेश कृषी केंद्र, सागर बीज भांडार, पाडळी येथील कल्याणी ऍग्रो सेंटर, चिखली येथील बालाजी शेतकरी कृषी केंद्र, संदीप कृषी केंद्र, मेरा खुर्द येथील वैभव कृषी केंद्र, उदयनगर येथील तिरुपती कृषी केंद्र, जांब येथील साई कृषी सेवा केंद्र, उदयनगर येथील ओंकार ऍग्रो आणि चिखली येथील सागर सीड्स अँड फर्टीलायझर्स या कृषी केंद्रांवर १६५ मेट्रिक टन म्हणजेच ३३०० बॅग युरिया खत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ‘या’ महिलांना मिळणार नाही; तुमचा लाभ बंद आहे का, तपासा!

आमदार सौ. श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी गरजेनुसार या कृषी केंद्रांवरून युरिया खताची खरेदी करावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या प्रगतीसाठी त्यांचा हा पुढाकार कौतुकास्पद आहे. कृषी विभागानेही याबाबत तत्परता दाखवत शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!