सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी सिंदखेड राजा येथे जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ५ ते १० जुलै दरम्यान संपूर्ण मतदारसंघात दौरे घेण्यात येत आहेत. या दौऱ्यांत आघाडीतील प्रमुख नेते व पदाधिकारी गावोगाव जाऊन जनतेशी थेट संवाद साधत आहेत.
या दौऱ्यात माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्यासोबत माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे, तसेच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे देखील उपस्थित राहणार आहेत.
तिन्ही पक्षांचे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उबठा गट) नेते व कार्यकर्ते प्रत्येक सर्कलमध्ये संयुक्त बैठकांद्वारे नियोजन करत आहेत. १४ जुलैचा मोर्चा ऐतिहासिक ठरावा यासाठी जय्यत तयारी सुरू असून, हा मोर्चा जनतेच्या भावना व प्रश्न मांडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.














2 thoughts on “सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!”