मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर आणि लोणार तालुक्यात २५ व २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ५०० ते ७०० कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.
खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकरच्या १० महसूल मंडळांमध्ये व लोणारच्या ५ मंडळांमध्ये सरासरी २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत पावसाचे प्रमाण २२७ मिमीपर्यंत गेले आहे. शासनाच्या नियमानुसार ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाला नैसर्गिक आपत्ती मानले जाते.
SDRF व NDRFच्या अंतर्गत नुकसानीची पाहणी सुरू असली तरी, प्रत्यक्षात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मदतीची नितांत गरज असल्याचे आमदार खरात यांनी स्पष्ट केले आहे.
1 thought on “मेहकर-लोणारात ढगफुटीसदृश पाऊस; आ.सिद्धार्थ खरात यांनी मागितले ७०० कोटींचे विशेष पॅकेज!”