मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाने मिळून एका माजी सैनिकाचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव तुळशीराम पठे (वय ५०, रा. मलकापूर) असे असून, आरोपी म्हणून त्यांची पत्नी जया पठे (वय ४५) आणि मुलगा निलेश पठे (वय २४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
EXCLUSIVE: भरदिवसा चाकूने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; एक आरोपी अटकेत, एक फरार
मलकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम पठे हे माजी सैनिक होते आणि त्यांचे पत्नी जया यांच्याशी बराच काळ कौटुंबिक वाद सुरू होता. या वादामुळे ते पत्नीपासून वेगळे राहत होते. मात्र, २६ जून २०२५ रोजी रात्री ते आपल्या घरी परतले. यावेळी त्यांच्यात आणि पत्नी-मुलामध्ये पुन्हा तीव्र वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, जया आणि निलेश यांनी मिळून तुळशीराम यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. खूनानंतर त्यांनी मृतदेह घराच्या बाथरूममध्ये लपवला आणि स्वतः घटनास्थळावरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता, या खुनामागे जया आणि निलेश यांचा हात असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
2 thoughts on “BREAKING: बुलडाणा जिल्हा हादरला! आठ दिवसात दुसरी घटना; मलकापुरात पत्नी आणि मुलाने मिळून केला मर्डर!”