माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

"तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?" बैलगाडी अडवून काठीने मारहाण!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज गावात माजी उपसरपंच गणेश शंकरराव ठेंग यांच्यावर एका युवकाने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गणेश ठेंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय प्रभाकर उदावंत या युवकाशी त्यांचा किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर अक्षयने पेंचीससारख्या धारदार वस्तूने गणेश ठेंग यांच्या डोळ्यावर वार करणार होता. त्याचबरोबर “तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चिखली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अक्षय उदावंत याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!