Shivbhim Jayanti Spacial: गजानन वायाळ यांच्या कल्पक आयोजनाखाली शिवभिम गीतांची अविस्मरणीय मेजवानी: प्रकाशदीप वानखडेंच्या गायकीने जिंकली रसिकांची मने

Shivbhim Jayanti Spacial: गजानन वायाळ यांच्या कल्पक आयोजनाखाली शिवभिम गीतांची अविस्मरणीय मेजवानी: प्रकाशदीप वानखडेंच्या गायकीने जिंकली रसिकांची मने

मेरा बु. ( कैलास आंधळे: बुलडाणा कव्हरेज न्युज): बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहानिमित्त मेरा बुद्रुक गावात गजानन संतोषराव वायाळ यांच्या कल्पक आयोजनाखाली आयोजित शिवभिम (Shivbhim Jayanti Spacial) गीतांच्या मैफिलीने रसिकांच्या मनावर गारुड घातले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भिमगायक प्रकाशदीप वानखडे यांच्या मधुर आणि अर्थपूर्ण गायकीने मेरा बुद्रुक आणि पंचक्रोशीतील रसिकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यांच्या परिसरात रंगलेल्या या भव्यदिव्य स्वरमंचाने उपस्थितीतला प्रत्येक रसिक एका अविस्मरणीय संध्याकाळीचा साक्षीदार ठरला.

कार्यक्रमाची भव्य सुरुवात

सायंकाळी 7 वाजता शिवभिम गीतांच्या या बहारदार मैफिलीला जल्लोषात सुरुवात झाली. आयोजक गजानन संतोषराव वायाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना श्रद्धेने माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांनी आपल्या रसाळ आणि मधुर वाणीने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली आणि रसिकांच्या मनात उत्साह संचारला.

Pik Vima Yojana: सुधारित पीकविमा योजनेला मंजुरी, आता केवळ पीक कापणी प्रयोगावरच भरपाई मिळणार

कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रतापराव मोरे उपस्थित होते. यावेळी गजानन वायाळ, ठाणेदार जारवाल आणि प्रकाशदीप वानखडे यांचा सत्कार रवींद्र डोंगरदिवे, निरंजन डोंगरदिवे, रामदास डोंगरदिवे, ज्ञानेश्वर पडघन, रामदास पडघन, बद्रीप्रसाद पडघन, संदेश चव्हाण, राहुल हिवाळे, निलेश डोंगरदिवे, सुनिल अंभोरे, दिपक पैठणे, संतोष तोडे आणि सागर पाटील यांनी केला.

सामाजिक प्रबोधन आणि सन्मान

अंढेरा पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी भीम जयंती शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखून आणि सामाजिक प्रेरणादायी उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गजानन वायाळ आणि पत्रकार सुनिल अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम जयंती उत्सव समितीने अनेक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सलग 10 तासांचा अभ्यास, निबंध स्पर्धा आणि इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार जारवाल आणि गजानन वायाळ यांच्या हस्ते उत्सव समितीला स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष पवन संतोष डोंगरदिवे, उपाध्यक्ष पवन शेषराव डोंगरदिवे आणि सचिव सागर मनोहर डोंगरदिवे यांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेत सक्षम सुनिल अंभोरे याने प्रथम, आरती दादाराव डोंगरदिवे हिने द्वितीय आणि दिशांत माधव हिवाळे याने तृतीय बक्षीस पटकावले. विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

Shivbhim Jayanti Spacial: शिवभिम गीतांनी रंगली रात्र

उद्घाटनानंतर प्रकाशदीप वानखडे यांच्या शिवभिम गीतांनी मैफिलीला खऱ्या अर्थाने रंगत आणली. शाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या “तू माझी माय, तू माझा बाप, माझा प्राण भिमा, तू बोधीवृक्ष आणि मी तुझेच पान भिमा” या वंदनगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या गीताने उपस्थित रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर “दोनच राजे इथे गाजले कोकणभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर” या शिवभिम गीताने उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला. गावाचा आसमंत गगनभेदी टाळ्यांनी दणाणून गेला.

प्रकाशदीप वानखडे यांनी सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी “अल्लाह जानता है मोहम्मद का मर्तबा” ही कव्वाली सादर केली. या गीताने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले आणि उपस्थितांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. यानंतर अजीम नवाज राही यांच्या “मनुच्या विचारांचे घोडे तूच पळविले, अंधाऱ्या वस्तीला उजेडाशी जुळविले” या भिमगीताने डॉ. बाबासाहेबांचे आभाळव्यापी कर्तृत्व अधोरेखित केले. रसिकांनी या गीताला अक्षरशः डोक्यावर घेतले.

Karj Mafi Yojana News: बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार! कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ५ मे रोजी सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा

“पत्र साहेबांचं रमाईला आलं” या हृदयस्पर्शी गीताने उपस्थित महिलांचे डोळे पाणावले. प्रत्येक गीताला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शेवटी “कुंभारापरी तू भिमा समाजाला घडविले, झिडकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले” या गीताने मैफिलीची सांगता झाली. रसिकांना रात्रभर हा कार्यक्रम असाच सुरू राहावा, असे वाटत होते.

या अविस्मरणीय मैफिलीच्या यशस्वितेसाठी गजानन संतोषराव वायाळ यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, सागर पडघन, संदेश चव्हाण, राहुल हिवाळे, निरंजन डोंगरदिवे, रवींद्र डोंगरदिवे, कुलदिप पैठणे, रामदास डोंगरदिवे, सागर डोंगरदिवे, पवन डोंगरदिवे, गुड्डू डोंगरदिवे, अश्विन अंभोरे, संतोष तोडे, त्र्यंबक डोंगरदिवे, वामन डोंगरदिवे, उत्तम डोंगरदिवे आणि समस्त बौद्ध उपासक, उपासिका तसेच गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या मैफिलीने मेरा बुद्रुक आणि पंचक्रोशीतील सर्व जाती-धर्माच्या रसिकांना एका मंचावर आणले. प्रकाशदीप वानखडे यांच्या गायकीने आणि गजानन वायाळ यांच्या कल्पक आयोजनाने ही संध्याकाळ प्रत्येकाच्या मनात कायमची कोरली गेली. रसिक आपापल्या घरी परतले, पण त्यांच्या मनात शिवभिम गीतांची अवीट गोडी आणि या मोरपंखी रात्रीच्या आठवणी घेऊन.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!