Shegaon News: तुला चांगली नोकरी लावून देतो,मग तिला लॉज वर बोलवत होता; लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत…

Shegaon News: तुला चांगली नोकरी लावून देतो,मग तिला लॉज वर बोलवत होता; लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेगाव शहर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. एका २१ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करण्यात आला असून, या प्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धनंजय संतोष पाटील (वय २४) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय याने तिला “तुला चांगली नोकरी लावतो” असे सांगत ओळख वाढवली. नोकरीच्या बहाण्याने दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला आणि त्यातून जवळीक वाढली.

नोकरीसंदर्भात बोलावून धनंजयने तिला शेगावमध्ये एका लॉजवर नेले. तेथे “मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करणार आहे” असे सांगून तिला फसवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर धनंजयने लॉजसह वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी अशाच प्रकारचे संबंध ठेवले.

मात्र काही दिवसांपासून आरोपीने तरुणीशी संपर्क तोडला. नोकरी आणि लग्न याविषयी काहीही बोलणे बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय संतोष पाटील याच्याविरोधात बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Road Safety Lesson Tragedy: क्षणात कोसळलेलं आयुष्य, अपघाताचा जीवघेणा आघात आणि एका स्वप्नाचा अंत

दरम्यान, शेगावमधील काही लॉजमध्ये अशा घटनांचा उगम होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अनेक महिलांवर अशाच पद्धतीने फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत घडले असून, पोलिसांकडून त्यावर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.

या घटनेने पुन्हा एकदा शेगावमधील लॉजमधील बेकायदेशीर धंद्यांकडे लक्ष वेधले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर सवाल उपस्थित होत आहेत

Join WhatsApp

Join Now

1 thought on “Shegaon News: तुला चांगली नोकरी लावून देतो,मग तिला लॉज वर बोलवत होता; लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!