दहीहांडा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ४ वर्षीय निरागस मुलीवर झालेले अत्याचार आणि निघृण हत्येचे प्रकरण उघड होताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी दहीहांडा ग्रामस्थांनी आज शांततामय रॅली काढली.
रॅलीदरम्यान नागरिकांनी “अल्पवयीन मुलींवरील अन्याय थांबवा”, “गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर ग्रामस्थांनी दहीहांडा पोलीस स्टेशनला भेट देत लेखी निवेदनाद्वारे आरोपींचा तातडीने शोध घेऊन पोक्सो, भादंवि आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
या निषेध रॅलीत संतोष मोहोरकार, गोविंद गोयनका, सुशील सहगल, पिटू सदार, संजय खाडे, शोभीत आठवले, अजय आठवले, निशांत सहगल, शत्रुघ्न आठवले, प्रशिक खंडारे, सय्यद मुजाहीद, सुधीर पळसपगार, पंकज नेमाडे, अमोल हंतोडे तसेच गावातील सर्व समाजघटकांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













