दुर्गम भागातील नागरिकांसाठी ‘कायदेविषयक शिबिर’ यशस्वी! शासकीय योजना व कायदेशीर मदतीची मिळाली थेट माहिती

दुर्गम भागातील नागरिकांसाठी 'कायदेविषयक शिबिर' यशस्वी! शासकीय योजना व कायदेशीर मदतीची मिळाली थेट माहिती

उदयनगर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): तालुका विधी सेवा समिती, चिखली व वकील संघ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने, तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या सहकार्याने दिनांक २० जुलै २०२५ रोजी किन्ही नाईक येथील आदिवासी आश्रम शाळेत एक महत्त्वपूर्ण कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. या उपक्रमाचे उद्दिष्ट दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व आवश्यक कायदेशीर मदत प्रदान करणे हे होते.

या शिबिरात तहसीलदार श्री. काकडे साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. डॉ. गवई (आरोग्य विभाग) व श्री. वाघ (महिला व बाल विकास विभाग) यांनी अनुक्रमे आरोग्य व महिला सक्षमीकरणाच्या योजनांची माहिती दिली. संरक्षण अधिकारी, अभयकेंद्र आणि पंचायत समितीच्याही योजनांची माहिती देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!