मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतातील मक्याचे कणीस आणि कांदे चोरी करताना पाहिले म्हणून सुरू झालेला किरकोळ वाद गंभीर हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना मेरा खुर्द येथे घडली. पतीला ढकलून मारहाण, विवाहितेची छेडछाड आणि दगडाने हल्ला अशा प्रकारांनी परिसरात खळबळ उडाली.
फिर्यादी सतीश मधुकर वाघमारे (वय ३४, रा. मेरा खुर्द) यांनी अंढेरा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार.. ते आणि त्यांची पत्नी शेतात असताना काही आरोपी मक्याचे कणीस व कांदे घेऊन जात असल्याचे दिसले. कारण विचारताच आरोपी संतापले व फिर्यादीला ढकलून मारहाण केली. पत्नीने हस्तक्षेप केला असता तिच्यावरही हात टाकून छेडछाड करत दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीने नमूद केले.













