बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चांडक लेआऊट येथील २५ वर्षीय विवाहितेला घरात एकटी असताना नातेवाईकाकडून अश्लील शिवीगाळ करत तिच्या पतीला चाकू मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत तिने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, घटना गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली. पीडिता घरात एकटी असताना तिचा नंदोई घरी आला. तो मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना अचानक वाईट उद्देशाने त्या महिला पीडितेशी अश्लील स्वरूपात बोलू लागला. पीडितेने विरोध केला असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पीडितेने “मी माझ्या पतीला फोन करते” असे म्हटल्यावर त्या आरोपी नातेवाईकाने आणखी रागावून तिच्या पतीलाही चाकू मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडितेने पतीसोबत शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवत आवश्यक कारवाईची मागणी केली आहे.













