प्रभाकर कायंदे यांच्या किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये भेटी-गाठी वर जोर; सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत, “फक्त लढायचं!” असा निर्धार…!

किनगाव राजा (ज्ञानेश्वर कळकुंबे :बुलडाणा कव्हरेज न्यूज)—स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रचार मोहिमांना जोरदार सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जनसंपर्क वाढविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभाकर कायंदे यांनी किनगाव राजा जिल्हा परिषद गटात सक्रिय प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत सर्कलमधील विविध गावांमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरू ठेवले असून, “फक्त लढायचं!” असा स्पष्ट संदेश आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रंगत आणणारा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

माजी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत तयार झालेले प्रभाकर कायंदे हे 1997 पासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मागील निवडणुकीत इच्छुक असूनही पक्षाने त्यांना थांबविले होते, मात्र त्यांनी पक्षनिष्ठा जपत निर्णय पाळला होता. यावेळी मात्र ते “आता थांबायचं नाही!” अशा भूमिकेत असून, 28 वर्षांच्या राजकीय व सामाजिक सेवेनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा निर्धार त्यांनी केला आहे.

सध्या कायंदे सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असून, किनगाव राजा सर्कलमध्ये सर्वेक्षणात सर्वात पुढे असल्याचे चित्र दिसते. “या वेळेस सर्कलचा चेहरामोहरा बदलणारच,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आता त्यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते आणि त्यांना कोणाचे आवाहन लाभते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किनगाव राजा गटातील ही चुरशीची लढत स्थानिक राजकारणात रंगत आणणारी ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!