चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये महाविकास आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नगराध्यक्ष पदासाठी काशिनाथ आप्पा बोंद्रे, तर नगरसेवक पदासाठी सौ. सिमा देव्हडे आणि मो. इसरार अब्दुल जब्बार यांच्या नावांचीच जोरदार चर्चा शहरभर रंगत आहे.
मतदारांमध्ये विकासाभिमुख नेतृत्वाची मागणी वाढत असून या तिन्ही उमेदवारांना मिळणारा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. स्थानिक समस्या सोडविण्याकडे लक्ष, महिलांच्या मुद्द्यांवरील सक्रिय भूमिका, तरुणांशी सतत संवाद आणि मूलभूत सुविधांवर दिलेला भर यामुळे मविआच्या या उमेदवारांविषयी सकारात्मकतेची लाट निर्माण झाली आहे.
सौ. सिमा देव्हडे यांचा महिला बचतगटांशी चांगला दुवा, इसरार जब्बार यांचा तरुणांमध्ये असलेला संपर्क आणि काशिनाथ बोंद्रे यांचे अनुभवसंपन्न व सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे प्रभाग ५ मध्ये मविआचे वातावरण अधिक मजबूत होताना दिसत आहे.
काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचाराला विशेष वेग मिळत असून त्यांचा शांत, अभ्यासपूर्ण आणि विकासाकडे नेणारा दृष्टिकोन मतदारांना भावतो आहे. प्रभागातील सभांना मिळणारा प्रतिसाद आणि घरभेटीदरम्यान दिसणारी उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे मविआ उमेदवारांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याचे जाणकारांचे मत आहे.













