चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी 1 वाजता चिखली शहरातील राजा टॉवर येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख तसेच नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ ते चिखलीत येत असून, या भेटीमुळे निवडणूक वातावरण आणखी तापले आहे.
सध्या शहरात थंडी वाढली असली तरी फडणवीस यांच्या आगमनाने राजकीय तापमान चांगलेच वाढण्याची शक्यता आहे. 2017 मध्येही ते चिखली नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते आणि तेव्हा नगराध्यक्ष पद भाजपकडे गेले होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचा यंदाच्या निवडणुकीत फायदा होणार की तोटा, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले या पंडित देशमुख यांच्या प्रचारासाठी शहरात तळ ठोकून घराघरात भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत.













