मलकापूरची मुलगी खुशबू परयाणीचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू; टँकरच्या धडकेत २७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मलकापूरची मुळ रहिवासी २७ वर्षीय खुशबू दीपक परयाणी हिचा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

खुशबू परयाणी ही खार (पूर्व) येथील खैरेवाडी भागात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती आणि आयसीआयसीआय बँकेत नोकरीला होती. रोजप्रमाणे ती कामावर जात असताना बीकेसी येथील एशियन हार्ट रुग्णालयाजवळ रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या टँकरने तिला जोराची धडक दिली. या धडकेत ती खाली पडून गंभीर जखमी झाली. सहकाऱ्यांनी तिला तात्काळ खैरवाडीतील गुरुनानक रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

खुशबूचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता आणि तिचे लग्न फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार होते. तिचे शिक्षण सी.ए. पर्यंत झाले होते आणि ती करिअरमध्ये यशस्वीपणे पुढे जात होती.

दरम्यान, अपघातानंतर टँकरचालक ललितकुमार हा घटनास्थळावरून फरार झाला होता. नंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश पाडवी यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!