केंद्र सरकारने देशातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी आधीच तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती — एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे.🚦 नियम न पाळल्यास मोठा दंडवाहनधारकांनी दिलेल्या कालावधीत HSRP बसवली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.🔸 HSRP साठी अर्ज केलेला पण प्लेट बसवली नाही — ₹1,000 दंड🔸 HSRP साठी अर्जच नाही आणि प्लेटही नाही — ₹10,000 पर्यंत दंडप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केले आहे की, “३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम तारीख असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.”🛑 बनावट वेबसाइट्सपासून सावधानHSRP नंबर प्लेट नावाखाली अनेक बनावट वेबसाइट्स आणि एजंटमार्फत फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने नागरिकांना फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे.🧰 फिटमेंट सेंटर वाढलीपूर्वी राज्यभर HSRP बसवण्यासाठी फिटमेंट सेंटर कमी असल्याने अडचणी येत होत्या. मात्र आता 20 पेक्षा जास्त अधिकृत फिटमेंट सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये, असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.📉 अजूनही 60% वाहनधारकांकडे HSRP नाहीराज्यात सध्या केवळ 40 टक्के वाहनांनाच HSRP प्लेट बसवली गेली आहे. त्यामुळे सरकार आणखी एकदा मुदतवाढ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र नोव्हेंबरनंतर कारवाई सुरू झाल्यास उशिर करणाऱ्या वाहनधारकांचा खिसा हलका होण्याची शक्यता नक्की आहे.
HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025; नियम मोडल्यास ₹10,000 पर्यंत दंड
Updated On: November 13, 2025 8:57 pm
















