चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगलगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे गावातील मुख्य रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
गांगलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शेषराव आराख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातील अतिक्रमणाची समस्या सोडवण्याचा धाडसी निर्णय ग्रामपंचायत कार्यालय मधील सर्व सदस्यांनी घेतला. अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने ३० फुट रुंदीचा रस्ता फक्त ६ ते ७ फूट एवढाच अरुंद उरला होता. नाल्या बुजवल्याने वाहतुकीला व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या परिस्थितीकडे लक्ष देत सरपंच आराख , नितीन म्हस्के, गणेश म्हस्के या सह ग्रामपंचायत कार्यालय सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी इंगळे यांनी अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना व नोटिसा देऊन अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले. काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून घेतली; मात्र काहींनी दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई केली.
गजानन महाराज मंदिर समोरील रस्त्यापासून ते गट क्रमांक ३६१ पर्यंत दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर जेसीबीने करवत चालवण्यात आली. या कारवाईमुळे मुख्य रस्ता पूर्ण ३० फुटांपर्यंत मोकळा झाला आहे.
यावेळी सरपंच शेषराव आराख, माजी सरपंच नितीन म्हस्के, ग्रामपंचायत अधिकारी एस.एम. इंगळे, उपसरपंच सीताबाई आराख, तसेच सदस्य संदीप सावळे, सौ. रेखा म्हस्के, सौ. मंदाबाई सावळे, सौ. प्रियांका म्हस्के, पोलीस पाटील सौ. दिपाली सावळे, अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे, बीट जमादार फोफळे, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
गावकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत करत सरपंच ,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष ग्रामपंचायत अधिकारी इंगळे यांचे धाडशी कौतुक केले.












