चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —
बळीराजा कार्यालय, उदयनगर येथे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघ आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष मा. ललित भाऊ बहाळे यांनी “चतुरंग शेती ही काळाची खरी गरज आहे” असे प्रतिपादन करत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.
….जाहिरात ☝️
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर आपल्या भाषणात मा. ललित भाऊ बहाळे म्हणाले,
“आजच्या युगात शेतकऱ्यांनी चतुरंग शेतीकडे वळले पाहिजे. जनुकीय तंत्रज्ञानाचा योग्य वापर, बाजारपेठेचे स्वातंत्र्य आणि मूल्यवर्धन यांच्या साहाय्याने आपण शेतीला औषधी व औद्योगिक मूल्य देऊ शकतो. त्यामुळेच शेतकऱ्यांची खरी आर्थिक उन्नती साध्य होईल.”
या प्रसंगी बियाणे महामंडळाचे संचालक मा. वल्लभराव देशमुख यांनीही शेतकऱ्यांनी धोरणात्मक विचार बदलण्याची आणि कौशल्य विकासावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
बैठकीला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास कणखर, स्वतंत्र भारताचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, मुरली महाराज येवले , डॉ. मोहने , मा. शेषराव पाटील, धोडपचे सरपंच कोल्हे, मा. डोईफोडे महाराज, अनमोल ढोरे पाटील,, नामदेवराव जाधव, प्रकाश घुबे, वसंतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “उदयनगर रत्न” सन्मानपत्र प्रदान करून अनेक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. सन्मानितांमध्ये गोविंद दांदडे, अमोल राऊत, गजानन लाहूडकार, संतोष ढोले, श्रीमती उषाताई देशमुख (भूमी आधार प्रोड्यूसर कंपनी), महान पिंजर, सौ. शारदाबाई टिकार, नितीन काळबांधे आदींचा समावेश होता.
सेंद्रिय शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा. देविदास भाऊ धोत्रे, नितीन काळबांधे, उषा ताई देशमुख, शारदाबाई टिकार, सरला टिकार, कल्पना देशमुख, गजानन लाहूडकार, राजेश्वर कवडकार, भास्कर बोदडे, अमोल राऊत, गोविंद दांदडे आणि संतोष ढोले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत महाले यांनी केले, सूत्रसंचालन विजय भाऊ डवंगे यांनी तर आभार प्रदर्शन नामदेवराव जाधव यांनी केले. शेवटी “खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे” या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम उदयनगर येथील बळीराजा कार्यालयात पार पडला असून कृषक सक्षमीकरणाच्या दिशेने एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक पाऊल ठरला आहे.















