चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 4 मध्ये भाजपाचे प्रचाराचे जोरदार वातावरण पाहायला मिळाले. आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या तुम्ही पंडित दादा देशमुख यांना मतदान रुपी आशीर्वाद द्या; राहिलेल्या विकास अजून जोराने करते असा शब्द चिखली शहर वासियाना दिला…भाजपाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार पंडितदादा देशमुख, तसेच प्रभाग क्र. 4 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक विश्वनाथ खरात आणि अब्दुल जकीयाबी रहेमान यांच्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीदरम्यान घरोघरी आबालवृद्धांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केले. मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना आपला आशीर्वाद व पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.













