MORNING BREAKING! खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव – शेगाव-खामगाव रोडवरील भीषण अपघाताच्या घटनेला आठवडाही उलटलेला नाही, तोच आज पुन्हा एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. खामगाव-नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ आज, १५ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसचा आणि विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश परिवहन विभागाची बस अमरावतीहून बऱ्हाणपूरकडे जात होती. दरम्यान, आमसरी फाट्याजवळ समोरून आलेल्या विटांचा ट्रक रॉंग साईडने भरधाव वेगात येत होता. त्यामुळे बस आणि ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. धडकेचा आवाज एवढा जोरदार होता की, आसपासचे लोक धावत घटनास्थळी आले.

Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…

या अपघातात ट्रकमधील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच, एसटी बसमधील २० प्रवासी जखमी झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून, रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रॉंग साईडने वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “MORNING BREAKING! खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी”

Leave a Comment

WhatsApp Join Group!