
देऊळगाव राजा (रणजीत खिल्लारे: बुलडाणा कव्हरेज न्युज): गुढीपाडवा या मराठी चैत्र नव वर्षाच्या शुभमूहर्तावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गावाची परंपरा सुरु ठेऊन आजची तरुण पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे या उद्देशाने देऊळगांव मही गावकऱ्यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी 1 एप्रिल रोजी मंगळवारला येथील सुप्रसिद्ध नंदी महादेव संस्थानाच्या भव्य-दिव्य प्रागाणात कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीसह मध्यप्रदेश,विदर्भ मराठवाड्याच्या असंख्य नामवंत मल्लांनी कुस्त्या खेळण्यासाठी देऊळगाव महीच्या आखाड्यात दाखल झाले होते.
या कुस्त्यांच्या दंगलीचे उदघाटन सरपंच वसूदेव पाटील शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या कुस्तीला श्रीफळ व अकरा रुपयापासून सुरुवात करण्यात आली होती.यंदाही आखाड्यात तब्बल एक लाखांची जंगी लूट करण्यात आली.शेवटची पंधरा हजार रुपयांची कुस्ती ही दिल्ली विरुद्ध जालना होती. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्यामुळे 10 मिनिटांची चित्त थरारक कुस्ती दंगल रंगली होती. दिल्लीचा उदय कुमार वय 21 व जालनाचा सिद्धांत पठारे वय 19 ह्या दोघांची अतिशय तुल्यबळ कुस्ती झाली. यामध्ये जालन्याच्या सिद्धांत पठारे मल्लांनी अनुभवाची लंगोट बांधून विविध डावपेज खेळत दिल्लीच्या उदयकुमारला शेवटच्या क्षणापर्यंत चांगलीच धूळ चारून मल्ल सिद्धांत पठारे हा आपली पाठ राखण्यास यशस्वी राहिला व पंधरा हजार रुपयांच्या शेवटच्या कुस्तीचा मानकरी ठरला. देऊळगाव महीच्या आखाड्यात कुस्त्यांची दंगल खेळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह खांडवा, अकोला, यवतमाळ, जालना, संभाजीनगर, बीड,परभणी, पळसी, हिंगोली येथील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नंदी महादेव संस्थान टेकडीवर कुस्त्यांचा आखाडा तयार करण्यात आला होता. कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सरपंच वसूदेव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर शिंगणे, उपाध्यक्ष सुरेश झिने,माजी सरपंच उमेश शिंगणे,तुकाराम महाराज शिंगणे, एकनाथ बापू शिंगणे,शेख जुल्फेकार भैया,रविंद्र इंगळे,शंकर शिंगणे,शेख. निसार शेख यासिन, मन्नानखान पठाण,पत्रकार संतोष जाधव, राम प-हाड, मो.इरफान,डिगांबर शिंगणे, माजी सैनिक राजू शिंगणे, कडुबा शिंगणे, सय्यद सईद,भरत शिंगणे,मो सादिकभाई , श्रीकृष्ण शिंगणे, बळीराम शिंगणे, प्रशांत पाटील शिंगणे, अनिल शिंगणे, पुरषोत्तम खंदारकर,सचिन शिंगणे,राजू शिंगणे,शेख.दादाभाई यांच्यासह असंख्य ग्रामस्थ व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.