
चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्युज): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासाठी त्यांचा वाढदिवस आनंदाचा ठरण्याऐवजी धक्कादायक घडामोडी घेऊन आला. अनेक वर्षे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपनगराध्यक्ष अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राहुल बोंद्रे यांच्या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक जुने कार्यकर्ते थेट भाजपमध्ये सामील होत आहेत तर काही जण गुपचूपपणे संपर्क तोडत आहेत. या घडामोडींमुळे बोंद्रे यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा वाढदिवसाच्या बॅनर वर फोटो, पण कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश!
चिखली शहरात काल ठिकठिकाणी राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक झळकत होते. मात्र, त्याच दिवशी काँग्रेससाठी धक्कादायक घटना घडली. सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले, आणि तब्बल दहा वर्ष उपनगराध्यक्षपद भूषवलेले अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन!
मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. रफिक कादर हे केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही प्रभावी नेतृत्व मानले जात होते. डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष आणि मुस्लिम अल्पसंख्यांक समाजात त्यांचा विशेष प्रभाव आहे.
गेल्या दोन निवडणुकांत ‘वरवरचा’ पाठिंबा?
राहुल बोंद्रे यांनी मागील दोन विधानसभा निवडणुका लढवलेल्या असल्या तरी कार्यकर्त्यांचा ‘तोंडावरचा’ पाठिंबा आणि आंतरिक नाराजी सतत जाणवत होती. मतदारसंघात नेतृत्वाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत कार्यकर्त्यांना डावलणे, आणि जनतेशी कमी संवाद यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते, असे स्थानिक चर्चेत आहे.
भाजपकडून सशक्त आयोजन – काँग्रेसमध्ये गोंधळ?
भाजपने गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर ताकद वाढवली आहे. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. यामुळे काँग्रेसमधील वरिष्ठ आणि सक्रिय कार्यकर्त्यांनाही भाजपकडे वळण्याचा मोह होतो आहे. रफिक शेठ यांच्यासारख्या नेत्याचा भाजप प्रवेश हा फक्त सुरुवात आहे, असं जाणकारांचं मत आहे.
चिखलीत जनसंवादातून तक्रारींचा तात्काळ निपटारा; आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा उपक्रम
बोंद्रे यांचं नेतृत्व धोक्यात?
या गळतीनंतर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढदिवसाच्या दिवशीच पक्षासाठी असे ‘गिफ्ट’ मिळाल्याने राहुल बोंद्रे यांचं नेतृत्व अधिकच लक्ष केंद्रित करतंय. पक्षाला सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ते कोणती पावलं उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “EXCLUSIVE: माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर काँग्रेसला जबर झटका! खास कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश, बोंद्रे यांचं नेतृत्व धोक्यात?”