Advertisement Advertisement

निमगाव हादरलं! विवाहितेनं घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं….

निमगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावातील येरळी येथे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्यापूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. सौ. प्रिया प्रविण लोणाग्रे (वय ३२) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे.


याबाबत स्वप्नील आनंदा लोणाग्रे (वय ३१, व्यवसाय शेती, रा. येरळी) यांनी नांदुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. फिर्यादी घरी असताना गावातील मित्रांनी फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर ते चुलत भावाच्या घरी गेले असता प्रिया लोणाग्रे या घराच्या छताला नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या.


आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, फिर्यादीने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या प्रकरणी म. पोहेकॉ सरोदे यांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


या घटनेनंतर ओम साई फाउंडेशन नांदुरा यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. नांदुरा पोलिसांनी कायम मर्ग क्रमांक १५/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद केली आहे.


या घटनेमुळे येरळी परिसरासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!