चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील पाच गावांना नव्या ग्रामपंचायत इमारती मंजूर झाल्या आहेत. यात चिखला, जांब, काटोडा, दिवठाणा आणि पिंपरखेड या गावांचा समावेश आहे. या इमारती बांधण्यासाठी राज्य सरकारच्या ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
राज्यात अशा ग्रामपंचायती आहेत ज्यांना स्वतःची कार्यालय इमारत नाही किंवा जी धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. अशा ग्रामपंचायतींना नव्या इमारती बांधण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने योजनेच्या निधी निकषात बदल करून मुदतवाढही दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अशा ३० ग्रामपंचायतींना इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात या योजनेअंतर्गत पाच ग्रामपंचायतींना नव्या इमारती मिळणार आहेत. आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी या गावांसाठी विशेष प्रयत्न केले आणि मतदारसंघातील अधिकाधिक ग्रामपंचायतींना लाभ मिळावा यासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. या इमारतींमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासोबत नागरी सुविधा केंद्राची खोलीही असेल, ज्यामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होईल.
मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी
या योजनेच्या निकषानुसार, ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३ हजारांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना स्वतःची इमारत नाही किंवा जी मोडकळीस आली आहे, अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हे प्रस्ताव मागवण्यात आले आणि त्यानुसार मंजुरी देण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला सुमारे २० लाख रुपयांचा निधी मिळेल, ज्यामुळे इमारत बांधकाम शक्य होईल.
आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चिखली मतदारसंघातील या पाच गावांना हा लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि गावकऱ्यांना सोयी उपलब्ध होतील.