हरणी गावात जुन्या वादातून दगडाने ठेचून खून; गावात खळबळ

हरणी गावात जुन्या वादातून दगडाने ठेचून खून; गावात खळबळ

मंगरूळ नवघरे, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): येथील हरणी गावात एका जुन्या वैराच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी

घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. मृतक गजानन बारकू पवार (वय ५५, रा. हरणी, जात वडर) हे घरातून ‘संडासला जातो’ असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. यामुळे त्यांचा भाऊ प्रकाश पवार आणि काही गावकरी त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. गावाबाहेरील एका जागी त्यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात मोठ्या दगडाने वार करून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

1.40 लाख पगारासह 248 जागांसाठी भरती, 2 सप्टेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात

या प्रकरणी मृतकाचा भाऊ प्रकाश बारकू पवार (वय ४२, रा. हरणी) यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ०२८८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आरोपी काशीराम शिवराम कुसळकर (रा. हरणी, जात वडर) याने जुन्या वैरातूनच ही कृत्य केले आहे. यापूर्वीही आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्वरित कारवाई केली आणि आरोपी काशीराम कुसळकरला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक निखिल निर्मळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस हवालदार ठाकूर आणि भुतेकर हे पुढील तपास करत आहेत.

मृतक गजानन पवार यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, पाच मुली, आई आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे हरणी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!